fbpx

मोदीसरकार विरोधात शरद पवार आणि ममता बॅनर्जी एकत्र

sharad pawar with mamata ji

कोलकाता: लोकसभा निवडणुकीला १४ महिने बाकी असतांना राजकीय पक्षांनी भाजपला मात देण्यासाठी कंबर कसली आहे. राजकीय बैठकींना जोर आलं असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येत्या २७ आणि २८ मार्चला दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे.

शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीचे पहिले आमंत्रण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. एकीकडे भाजपविरोधात यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी सक्रिय झाल्या आहेत तर दुसरीकडे शरद पवार आणि ममता बॅनर्जी एकत्र येऊन भाजप विरोधात लढा देतील, अशे चित्र दिसत आहे.

शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, आघाडीचे नेतृत्व कोण करणार, हा मुद्दा गौण असून, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तिसरा सक्षम पर्याय द्यायला हवा असे मत ममतांचे असल्याचे, राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.