शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट, शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देश : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप सेनेते प्रवेश केला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री छगन भुजबळ हे पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही चर्चा केवळ एक अफवा आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. तरी देखील छगन भुजबळ यांच्या सध्याच्या हालचालींवरून भुजबळ हे शिवसेना प्रवेश करणार असल्याचं बोलल जात आहे.

भुजबळ यांनी शिवसेना प्रवेश केला तर नाशिक मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना भेटीसाठी बोलावलं आहे. शरद पवार आणि छगन भुजबळ यांची होणारी भेट ही लक्षवेधी ठरणार आहे. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला जबरदस्त धक्के बसले आहेत. त्यामुळे भविष्यात अजून एखादा धक्का बसू नये यासाठी भुजबळांची मनधरणी करणारी भेट तर नाहीना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील भुजबळांच्या प्रवेशावर सूचक विधान केले आहे. वेळ आल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, असे विधान त्यांनी केले आहे. एका बाजूला  उद्धव ठाकरे यांचे विधान आणि दुसऱ्या बाजूला  पवार – भूजबळ यांची भेट त्यामुळे छगन भुजबळ यांच्या पक्षांतराबाबत  मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.