शरद पवारांना प्रतिगामी मानत नाहीत- प्रकाश आंबेडकर

शरद पवारांनी फुले पगडी स्वीकारली याचा आनंदच

पुणे : भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी, या बॅनर खाली निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले. तसेच वंचित समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी याकरिता त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुरोगामी विचारांच्या पक्षांनी आमच्यासोबत यावे. आमचे दरवाजे मोकळे आहेत. आमच्या अटी मान्य असणाऱ्या पक्षासोबत जाऊ. पवारांसोबत जाणार नाही. शरद पवारांना प्रतिगामी मानत नाही मात्र त्यांनी बरीच पावले प्रतिगामी उचलली आहेत.पेशवाईला आमचा विरोधच आहे. पवारांनी फुले पगडी स्वीकारली याचा आनंदच आहे.

धनगर समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे- अशोक चव्हाण

भारिपची ४८ मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी आहे. धनगर-२, माळी-2, ओबीसी-२, मुस्लिम-2 या घटकांना जो उमेदवारी देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, तो पुरोगामी विचारांचा पक्ष असावा. काँग्रेसच्या हाती एकहाती कारभार देण्यासाठी लोकं तयार नाहीत. हे त्यांनी लक्षात घ्यावे.भाजप विरोधातील जनतेत राग असून जनता पर्याय शोधते आहे. मी निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. असे प्रकाश आंबडेकर यांनी स्पष्ट केले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला – प्रकाश आंबेडकर

You might also like
Comments
Loading...