जळगाव हे खऱ्या अर्थाने ‘ गांधीवादी ‘ शहर ; शरद पवारांनी जागवल्या आठवणी

मुंबई:भाजप बंडखोर आणि नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसवासी झालेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दोन दिवसापूर्वी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि त्यावेळीच हे घोषित केले होते की मी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात काम करेल.आज फक्त ती औपचारिकता पूर्ण करत खड्सेंचा मुंबईत वाय.बी.चव्हाण सेंटर या ठिकाणी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी एकनाथ खडसेंनी दमदार भाषण करत उपस्थितांची मने जिंकून घेतली.अनेक आठवणी जागवल्या.भाजपच्या अनेक नेत्यांची पाचावर धारण बसेल असे काही ‘बिटवीन द लाईन्स’ किस्से देखील सांगितले.

कोविडचा प्रादुर्भाव पाहता मर्यादित स्वरूपाचा हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.पण तरीही प्रचंड गर्दी जमलीच होती.राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते,एकनाथ खड्सेंचे चाहते आले होते.खासकरून उत्तर महाराष्ट्रातून त्यातही जळगाव जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते आले होते.

प्रसंगी बोलतांना शरद पवारांनी देखील जळगाव जिल्ह्याच्या काही आठवणी जागवल्या पवार म्हणाले की ‘ बंधुंनो तुमच्या जळगाव जिल्ह्यात मी पूर्वी आणि आज देखील कधी आलोच तर सत्कार करतांना प्रामुख्याने खादीच्या रुमालाचा वापर करत सत्कार केला जातो.सोबतच त्या जिल्ह्याने अनेक गांधीवादी नेते जन्माला घातले आहेत म्हणून जळगाव जिल्हा हा खऱ्या अर्थाने ‘गांधीवादी’ जिल्हा आहे असे मला वाटते.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-