शरद केळकर ‘राक्षस’ मध्ये प्रमुख भूमिकेत

sharad-kelkar-plays-a-leading-role-in-rakshash

टीम महाराष्ट्र देशा :  नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन‘ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित आणि समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड फिल्म्स‘ प्रस्तुत ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस‘ असे हटके नाव असलेला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत एक जबरदस्त ‘बाहुबली’ आवाज असलेला अभिनेता आपल्या भेटीला येणार आहे, ज्याने संग्राम ही खलनायकाची ‘लय भारी’ भूमिका साकारत तमाम मराठी रसिकांची मने जिंकली होती तो अभिनेता म्हणजे शरद केळकर. प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आणि शरद केळकर अशी नवीन, फ्रेश जोडी प्रेक्षकांना ‘राक्षस’ ‘या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केळकर अविनाश ही व्यक्तीरेखा यामध्ये साकारत असून तो एक डॉक्यूमेंट्री मेकर आहे, त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ‘राक्षस’ मध्य पाहायला मिळणार आहे.

Loading...

राक्षस’ असा शब्द उच्चारला तरी अंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाहीत. राक्षसाची विविध रूपे आजपर्यं आपण गोष्टींमध्ये ऐकलेली आहे.  आदिवासी पाड्यांवर लहानपण गेलेल्या ज्ञानेश झोटींग यांचं ‘राक्षसच लेखन अनुभवसिद्ध असून त्यांनी त्यांचे लहानपणचे अनुभव चित्रपटाच्या कथेत अतिशय सुंदरपणे गुंफले आहेत.

राक्षस…! अनेकांचे हातभार लागून ह्या सिनेमाची निर्मिती झालेली आहे. अनेक राक्षसी वृत्तींशी लढत हा सिनेमा पूर्ण झालेला आहे. हा माझा पहिलाच सिनेमा आहे. या पहिल्या सिनेमाचे स्वप्न मी अनेक वर्ष उराशी बाळगलं आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी गेली ३ वर्ष मी अविरत झटलो आहे. आयुष्यातल्या सर्व पहिल्या गोष्टी आपल्याला अमुल्य असतात. याच भावनिक अर्थाने हा सिनेमा माझ्यासाठी अमुल्य आहे. आता हा सिनेमा तयार होऊन प्रदर्शनासाठी सज्ज आहे. २३ फेब्रुवारी २०१८ रोजी तो प्रदर्शित होणार आहे. सिनेमा कसा झाला काय झाला हे प्रेक्षक आणि या क्षेत्रातले जाणकार ठरवतीलच. माझा सिनेमा फार ग्रेट आहे असा आव आणण्यात मला भूषण वाटत नाही. सिनेमा साधाच आहे पण त्यातलं म्हणणं अत्यंत प्रामाणिक आहे हे मात्र मी अभिमानाने सांगू शकेन. “शोषण करतो तो राक्षस” हे साधं म्हणणं मी या सिनेमातून मांडू पाहतो आहे. तोच माझा विचार आहे. तीच माझी भूमिका. शोषणाच्या विरोधात अभिव्यक्त होणे..हेच माझे शिक्षण. शोषणाच्या बाजूने मी कधीही उभा राहणार नाही. “उलगुलान !!!” शुsss!! राक्षस जागा होतो आहे! – ज्ञानेश झोटिंग 

राक्षस चित्रपटात ऋजुता देशपांडेदयाशंकर पांड्येविजय मौर्ययाकूब सैदपूर्णानंद वांदेकरउमेश जगतापविठ्ठल काळे,पंकज साठेअनुया कळसकरअनिल कांबळेमकरंद साठेजयेश संघवीसविता प्रभुणेसाक्षी व्यवहारेअभिजित झुंझाररावसोमनाथ लिंबारकर इत्यादी कलाकारांच्या सुंदर अभिनयानं वेगळ्या आशयाच्या या चित्रपटाला योग्य तो न्याय दिला आहे.

दरम्यान या चित्रपटाच्या पहिल्या प्रभावी पोस्टर मुळे चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली असूनशरद केळकरचा वेगळा लुक असलेल्या या नव्या पोस्टरमुळे ती अजून ताणली गेली आहे. या ‘राक्षस’ मध्ये नेमकं काय गुढ दडले आहे याची उकल येत्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे