‘मी बेवडा आहे हे पहायला ‘त्या’ माझ्या घरी आल्या होत्या का’?

प्रणिती शिंदे यांच्या या बेताल आणि बालिश वक्तव्यावरून असेच वाटते की त्यांच्यावर घरातून योग्य संस्कार झाले नसावेत.

टीम महाराष्ट्र देशा- सोलापुरातील एका कार्यक्रमात भाजपवर टीका करताना प्रणिती शिंदे यांनी भाजप खासदाराचा चक्क बेवडा खासदार म्हणून उल्लेख केला. यावर वक्तव्यावर खासदार शरद बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी नेहमी महिलांचा आदर करतो पण त्याचा गैरफायदा घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी माझे वैयक्तिक चारित्र्य हनन करू नये. त्याच्या या बेताल आणि बालिश वक्तव्यावरून असेच वाटते की त्यांच्यावर घरातून योग्य संस्कार झाले नसावेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बलिशपणाचे वक्तव्य त्यांनी करू नये अन्यथा मुंबईत काय काय घडते ते सोलापुरात उघड करायला वेळ लागणार नाही असे ते यावेळी म्हणाले.

नेमकं काय म्हणाले बनसोडे ?
मी नेहमी महिलांचा आदर करतो पण त्याचा गैरफायदा घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी माझे वैयक्तिक चारित्र्य हनन करू नये. त्याच्या या बेताल आणि बालिश वक्तव्यावरून असेच वाटते की त्यांच्यावर घरातून योग्य संस्कार झाले नसावेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बलिशपणाचे वक्तव्य त्यांनी करू नये अन्यथा मुंबईत काय काय घडते ते सोलापुरात उघड करायला वेळ लागणार नाही.

त्याचे वडील माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत कधीच कोणावर वैयक्तिक टीका केली नाही. पण मुलगी मात्र बालिश आणि बेताल वक्तव्य करून स्वतःचीच संस्कार न झालेली बुद्धी पाजळत आहे. मी बेवडा आहे हे पहायला त्या माझ्या घरी आल्या होत्या का ते आधी त्यांनी सांगावे ?या पुढील काळात असे वैयक्तिक टीका करू नये अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल .