कृतिबध्द आराखडा तयार करून गावाला विकासाचा आकार द्या: अर्जून खोतकर

जालना : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागाच्या विकासास प्राधान्य दिले आहे. तसेच नवनिर्वाचित सदस्यांनीही आराखडा तयार करून गावाला विकासाचा आकार द्यावा, असे आवाहन शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी केले.

मौजपुरी येथील ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले असून उपसरपंचांसह पॅनल प्रमुख आणि सदस्यांनी अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी अर्जून खोतकर यानी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, पंडीत भुतेकर, माजी सभापती पांडुरंग डोंगरे यांची उपस्थिती होती.

मौजपुरी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने नऊ पैकी पाच जागांवर दणदणीत विजय मिळवून ग्रामपंचायत वर वर्चस्व प्रस्थापित केले. उपसरपंचपदी आप्पासाहेब डोंगरे यांची निवड झाली. तर सदस्य म्हणून सत्यनारायण ढोकळे, सौ लता बंडू काळे, मीरा नारायण गायकवाड, मनीषा विष्णू डोंगरे हे निवडून आले आहेत. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी विजयी सदस्य व शिलेदारांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या