fbpx

भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली

पुणे : भंडार्‍याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झालेली आहे. गोयल हे पालिकेचे तिसरे अतिरिक्त आयुक्त असतील. दरम्यान राज्यात काल २६ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अहमदनगर इथल्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी पी टी वायचळ यांची सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची औरंगाबाद इथं वीज महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय सह संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.