लावणी सम्राज्ञी पाठोपाठ शांताबाई फेम संजय लोंढे राष्ट्रवादीत करणार प्रवेश

sanjay londe

पुणे : सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई येथे १६ तारखेला त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनात होणाऱ्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र सुरेखा पुणेकर यांच्या पाठोपाठ आता शांताबाई फेम संजय लोंढे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

येत्या 16 तारखेला मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. शरद पवार,अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात येऊन कलावंतांसाठी काम करण्याची इच्छा असल्याचे  साहाता संजय लोंढे यांनी सांगितले आहे.

शांताबाई हे गाण प्रचंड गाजले. या गाण्याची जादू आजही कायम आहे. या गाण्यामुळे संजय लोंढे यांना एक खास ओळख मिळाली. पुण्यात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म, सध्याही गरिबीत दिवस काढले आहेत. तसेच मध्यंतरी त्यांची लोकप्रियता कमी झाल्याचे देखील पाहायला मिळाले. मात्र आता संजय राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे कळताच त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत सांगितले की, ‘कुठल्याच अपेक्षेने राजकारणात प्रवेश करत नसून लॉकडाऊन काळात व नंतर होत असलेल्या सर्वच क्षेत्रातील कलाकारांच्या व्यथा सरकारदरबारी मांडण्यासाठी मी राजकारणात येत असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

महत्त्वाच्या बातम्या