मनुस्मृतीत सर्वांना समान अधिकार – शंकराचार्य

Swami-swaroopanand-Saraswat

अलाहाबाद : मनुस्मृतीत सर्वांना समान अधिकार असल्याचा दावा द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी केला आहे तसेच हिंदू कधीही जातीसाठी एकमेकात भांडत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे . कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणावरून सध्या मोठ्या प्रमाणावर वातावरण तापल आहे या पार्श्वभूमीवर शंकराचार्यांनी हे प्रकरण जातीय संघर्ष नसल्याचं सांगत दलित हे देखील हिंदूच आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

अलाहाबादमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सुरुवातीला कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणावर खेद व्यक्त केला. तसेच हे सर्वजण जातीसाठी एकमेकांशी भांडत नसल्याचं सांगितलं. शंकराचार्य म्हणाले की, “महाराष्ट्रातील हिंसाचारानंतर दलितांना बिगर हिंदू असल्याचं सांगितलं जात आहे, ते अतिशय धोकादायक आहे. दलित समाज हा देखील हिंदू धर्माचा अविभाज्य भागच आहे. आणि त्यांनाही समान अधिकार आहेत.”हे हिंदू असण्यासाठी नाही, तर माणुसकीसाठी अतिशय गरजेचं आहे. मनुस्मृतीवर जातीच्या आधारे भेदभाव करण्याचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. वास्तविक, यात प्रत्येक जातीला समान अधिकार देण्यात आला आहे.”