शंकराचार्यांचा भाजप आणि संघावर हल्लाबोल; भाजपचे नेतेच बीफचे सर्वात मोठे निर्यातदार

swaroopanand-saraswati

नवी दिल्ली: भाजप आणि संघामुळेच हिंदुत्वाचे मोठे नुकसान झाले असल्याची सडकून टीका शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला वेगळ वळण लागल आहे. शकराचार्य स्वरूपानंद यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली आहे. मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही, हे फार धक्कादायक आहे, असेही शंकराचार्यांनी म्हटले आहे.

भाजपवर शंकराचार्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले प्रत्यक्षात भाजपचे नेतेच बीफचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत. असे असतानाही भाजप गोहत्येचा विरोध करते आणि बीफ निर्यात हा भारताला लागलेला डाग असल्याचे सांगते. भाजपने खरोखरच देशाला दिलेली अश्वासने पूर्ण केली काय? खरोखरच हव्या त्या प्रमाणात नागरिकांना रोजगार मिळाला काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील गरीबातील गरीब व्यक्तिला १५ लाख रूपये देण्याचे अश्वासन दिले होते. ते खरेच पूर्ण झाले? आयोध्येत राम मंदिर उभारले? असे एकाहून एक प्रश्न शंकराचार्यांनी उपस्थित केले. तसेच, या प्रश्नाचे उत्तर देण्यात भाजपचे नेते अपयशी ठरत आहेत. याच नेत्यांनी २०१४ मध्ये निवडणूक प्रचार केला होता असेही ते म्हणाले.

शंकराचार्य यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका करतांना म्हणाले, मोहन भागवत यांना हिंदू धर्माबाबत काहीच माहिती नाही, हे फार धक्कादायक असल्याचे सांगताना शंकराचार्य म्हणाले, ‘भागवत म्हणतात की, हिंदू धर्मात लग्न हा एक करार आहे. पण, विवाह ही जीवनभराची साथ आहे. तसेच, भागवत म्हणतात की, जो भारतात तो हिंदूच आहे. तर, अमेरिकेत हिंदू आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना काय म्हणणा?’, असा सवालही शंकराचार्यांनी विचारला आहे.Loading…
Loading...