शनिशिंगणापूर देवस्थान राज्य सरकारच्या ताब्यात ; रात्री उशिरा विधानसभेत विधेयक मंजूर

टीम महारष्ट्र देशा : शनिशिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थान आता राज्य सरकारने आपल्या ताब्यात घेतले आहे. येथील विश्वस्त मंडळही बरखास्त करण्यात आले आहे. या संबंधीचे श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था (शिंगणापूर) विधेयक, २०१८ बुधवारी मध्यरात्री विधानसभेत मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेनेने यासाठी विरोध नोंदविला होता. मात्र, सेनेचा विरोध झुगारून सरकारने विधेयक मंजूर केले.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत विधानसभेचं कामकाज सुरू होतं. रात्री १२.३० वाजता शनिशिंगणापूर मंदिर ताब्यात घेण्याचं विधेयक चर्चेला आणि ते मंजूर करण्यात आलं. त्यामुळे आता मंदिराच्या सध्याच्या सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. मंदिराचा कारभार पारदर्शक व्हावा आणि भाविकांना दर्जेदार सुविधा देण्याचं काम आता या कायद्यानुसार होणार आहे.

दरम्यान, शनिशिंगणापूर मंदिराच्या सरकारीकरणास हिंदू जनजागृती समितीने विरोध केला होता. सरकारने हा निर्णय रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. हा विरोध डावलून सरकारने अखेर हे विधेयक मंजूर केले आहे.

वारक-यांनी दिली महेश लांडगे यांच्या कामाची पावती