शनी शिंगणापुर ग्रामस्थ व उपोषणकर्त्यांच्या रेट्यापुढे  देवस्थान प्रशासन अखेर झुकले

टीम महाराष्ट्र देशा : शनी शिंगणापुर देवस्थान सरकारच्या ताब्यात जाणार असल्याच्या शासन निर्णयानंतर देवस्थान मध्ये होत असलेल्या गैरकारभार व कामगार भरती प्रक्रियेत झालेल्या  भ्रष्टाचारा विरुद्ध व अन्य मागण्यांच्या संदर्भात विश्वस्त वैभव शेटे ,सरपंच व ग्रामस्थ यांच्या सह उपोषणाला बसले होते.
अखेर शिंगणापर देवस्थान गैरकारभाराविरोधात केलेले उपोषण ५ व्या दिवशी सुटले.आज बुधवारी तहसीलदार उमेश पाटील यांच्या मध्यस्तीने खालील मागण्यांवर उपोषण सोडण्यात आले.
१) बेकायदेशीर कर्मचारी भरती
२) देवस्थान सर्व पगार पत्रक मिळणे
३) देवस्थान मालकीच्या सर्व वाहनांची माहिती मिळणे
या मागण्यांबाबत देवस्थान विश्वस्त मंडळाने सर्व माहिती ३१ जुलै २०१८ रोजी देण्याचे लेखी आश्वासन दिले.देवस्थान कमेटी प्रोसिडिंग व इतर बहूतांशी कागदपत्रे उपोषण सोडवताना देण्यात आली आहेत.
bagdure
उपोषण सोडण्यासाठी तहसिलदार नेवासा , पोलिस अधिकारी, ग्रामस्थ , उपस्थित पदाधिकारी ,  तालुक्यातील नागरिक हजर होते.
जेष्ठ नेते बाळासाहेब बोरुडे , प्रकाशभाऊ शेटे , डाॅ. वैभव शेटे , डाॅ. राजेंद्र शेटे यांनी मनोगत व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले.यावेळी सरपंच बाळासाहेब बानकर, बाप्पूतात्या शेटे, सयाराम बानकर, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा ,भाजयुमो चे  तालुकाध्यक्ष सतीश कर्डीले, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष नवनीत सुरपुरीया यांच्यासह  ग्रामस्थ युवक उपस्थित  होते.

ऑलिम्पिक विजेत्याला नमवून नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्णवेध

मुख्यमंत्र्यांची थेट जनतेतून निवड करण्याची हिंमत भाजपने दाखवावी – धनंजय मुंडे

You might also like
Comments
Loading...