मुख्यमंत्र्यांनी घेतले शनी शिंगणापुर येथे शनी दर्शन

नेवासा / भागवत दाभाडे: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिशिंगणापूर येथे येऊन शनी दर्शन घेतले. दोन्ही मुख्यमंत्र्यांची समोरासमोर भेट झाल्याने त्यांनी गळाभेट घेऊन एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही मुख्यमंत्री आल्यामुळे भाविकांना तब्बल दिडतास दर्शन बंद करण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांनी उदासी महाराज मठात अभिषेक करून विधिवत पूजा केली व शनिदेवाना तेल अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी आमदार विनायक मेटे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार शिवाजीराव कर्डीले, मा.खा. भाऊसाहेब वाकचौरे , शनिभक्त नवणीतभाई सुरपुरीया, युवा नेते सुवेंद्र गांधी, राजेंद्र पिपाडा, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीश कर्डीले ,जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा , अंकुश काळे,उपस्थित होते. नेवासा तालुका भाजपच्या वतीने कार्यालयाजवळील शेड मध्ये मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री प्रथमच शनी दर्शनासाठी आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, बाळासाहेब पवार, रणछोडदास जाधव, सुभाष पवार, प्रशांत बहिरट, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.