कानपूर : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा (Australia Cricket Team) माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू शेन वॉर्न (Shane Warne) चा अपघात झाला आहे. शेन वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत मोटारसायकल चालवत असताना हा अपघात झाला आहे. घटनेच्या वेळी तो आणि त्याचा मुलगा स्प्बत होते. शेन वॉर्नचा अपघात मेलबर्न शहरात झाला आहे. या अपघातात शेन वॉर्नला थोडी दुखापत झाली आहे. सुदैवाने शेन वॉर्न या अपघातातून बचावला आहे. शेन वॉर्नला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न त्याच्या मुलासोबतमेलबर्न शहरात मोटारसायकलवरून जात असताना रविवारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात शेन वॉर्नच्या पायाला दुखापत झाली आहे.
चांगली गोष्ट म्हणजे शेन वॉर्नला गंभीर दुखापत झाली नाही, त्यामुळे त्याला तत्काळ उपचार देण्यात आले नाहीत, मात्र सोमवारी सकाळी शेन वॉर्नला दुखू लागल्याने तो तपासणीसाठी रुग्णालयात गेला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा महान खेळाडू शेन वॉर्न गेल्या 2 वर्षांपासून मोटारसायकल चालवत आहे. वॉर्न रविवारी मेलबर्न शहरात बाईक चालवत असताना हा अपघात झाला.
महत्वाच्या बातम्या
- हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी शुक्रवारी पुन्हा बैठक
- ‘भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे…’, फरार मेहुल चोक्सीने व्यक्त केली भीती
- जिल्ह्यातील ‘या’ गावांनी केला 100 टक्के लसीकरणाचा आकडा पार
- किती गोंधळ झाला हा मापदंड मानण्यापेक्षा विरोधकांनी…-पंतप्रधान मोदी
- ‘महाविकास आघाडीतील अजून चार नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होणार’,सोमय्यांचा इशारा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<