शार्दुल ठाकूरला वगळलं शमीचं पुनरागमन ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पहिल्या ३ वन-डे साठी भारतीय संघाची निवड

indiancricket

वेब टीम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ३ वन-डे मालिकेसाठी बीसीसीआयने १६ सदस्यांच्या भारतीय संघाची आज घोषणा केली आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या वन-डे मालिका संघात फारसे बदल न करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीही रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा या फिरकीपटूंना वगळण्यात आलं आहे. उमेश यादव आणि मोहम्मद शमी या खेळाडूंनी भारतीय संघात कमबॅक केले आहे.

१७ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया संघाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी संघात निवड झालेल्या शार्दुल ठाकूरला मात्र या संघात जागा मिळालेली नाही. त्याजागी  उमेश यादव आणि मोहम्मद शमीला पुन्हा संघात स्थान देण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी असा असेल भारताचा वन-डे संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी.