दोन किमी परिघातच संचाराची अट रद्द करण्याची ठाकरे सरकारवर नामुष्की

uddhav Thackeray

मुंबई : घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवासमुभा देण्याच्या मुंबई पोलिसांच्या अटीबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्य सरकारने शुक्रवारी ही अट रद्द करून घराजवळच खरेदी करण्याचे आवाहन केले. पोलिसांनाही त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हा आदेश लागू केल्यापासून मुख्यमंत्री आणि राज्य सरकार टीकेचे धनी बनले होते. मुख्य विरोधीपक्ष असणाऱ्या भाजपने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. आता हा निर्णय मागे घेतल्याने राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार समोर आल्याची टीका भाजपकडून केली जात आहे.

महाराष्ट्र सरकारने दोन किलोमीटरचा नियम सांगून 40 हजार पेक्षा अधिक गाड्या जप्त केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्य़ात पुन्हा टाळेबंदी लागू करणे, मुंबईत घरापासून दोन किमीच्या आत प्रवासास मुभा देणे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करणे यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

मुंबईत रविवार आणि सोमवार असे दोन दिवस अनेक वाहने जप्त करण्यात आली. यावरून महाविकास आघाडीच्या विरोधात असंतोष पसरला होता. दरम्यान, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना सुसंवाद असावा, संबंधित खात्याच्या मंत्र्यांना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे .

आता विस्तारवादाचं युग संपलं; पंतप्रधान मोदींचा चीनला थेट इशारा

टिकटॉकवर बंदी; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी केले सरकारच्या निर्णयाचे तोंडभरून कौतुक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाची होणार चौकशी!