‘भाजपा वालों कुछ तो शर्म करो’, लव जिहाद मुद्यावर सावंतांनाची भाजपवर जोरदार टिका 

सावंत

मुंबई : मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे.

लव्ह जिहाद किंवा रोमियो जिहाद हे मुस्लिम पुरुषांनी मुस्लिम नसलेल्या मुस्लिमांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रेमाचं आमिष दाखवून धर्मांतर करण्यातला लावण्याचा प्रकार समजला जातो. प्रेमाचा ढोंगीपणा आहे. भारतामध्ये केरळमध्ये प्रथम आणि नंतर कर्नाटकमध्ये २००९ मध्ये या संकल्पनेने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. हा शब्द भारताच्या संदर्भात वापरला जातो पण ब्रिटनसारख्या देशांमध्येही अशाच प्रकारच्या कृती झाल्या आहेत.

भाजपशासित राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. तर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. यावरच शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मुद्द्यांसंदर्भात भाष्य केले. लव्ह जिहाद हा केवळ भाजपाचा अजेंडा आहे. भाजपा या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करताना दिसत आहे. लव्ह जिहाद कुठे झालाय? हे आम्ही भाजपाला नक्कीच दाखवून देऊ. पण लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भाजपा नेते मात्र यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे”,

आता ‘लव जिहाद’वर बोलताना सचिन सावंत यांनी भाजप वर जोरदार टीका केली ‘कुछ तो शरम करो भाजप वालो म्हणत, मुक्तार अब्बास नक्वी यांच्या पत्नी सीमा आणि शाहनवाज हुसैन यांच्या पत्नी रेणू या दोघीही हिंदू आहेत. हाच मुद्दा उचलून धरत त्या दोघांनी केल तर ते लव्ह आणि इतरांनी केले तर ते लव्ह जिहाद’ अस ट्विट करत सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या