‘भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटते’; अफेअरच्या चर्चांवरून भडकली मुनमुन दत्ता

munmun datta

मुंबई : गेली तेरा वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करणारा टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या शोबद्दल सतत काही ना काही चर्चा सुरू असतात. सध्या या शोमधील बबिता आणि टप्पू म्हणजे राज अनादकत यांची रियल लाईफमध्ये एकमेकांना डेट करत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत होती.मुनमुन दत्तापेक्षा तो तब्बल नऊवर्ष लहान आहे. यावरून या दोघांना प्रचंड ट्रोल करण्यात आले. मात्र यावर आता बबिता अर्थात मुनमून दत्ताने संताप व्यक्त केला आहे.

मुनमूनने एक पत्र इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. भारताची लेक म्हणायला लाज वाटते असे म्हणत तिने तिचा संताप व्यक्त  केला आहे. तिने शेअर केलेल्या पत्रात लिहिले की, ‘मला तुमच्याकडून यापेक्षा खूप चांगल्या अपेक्षा होत्या. पण कमेंट्समध्ये जी घाण तुम्ही ओतली, त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की, ‘सुशिक्षीत’ असूनही आपण एका मागासलेल्या समाजाचा भाग आहोत. केवळ स्वत:च्या मजेसाठी एखाद्या महिलेच्या वयावर, तिच्या संबंधांवर नको ते बोलून तिला लाजीरवाणं केलं जातं.

पुढे ती म्हणते की, ‘मी गेल्या 13 वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करतेय. पण माझी बदनामी करण्यासाठी तुम्हाला 13 मिनिटंही लागली नाहीत. तुमचे शब्द एखाद्याला आत्महत्या करायला भाग पाडतील, त्याआधी फक्त एकदा विचार करा. तुमचे शब्द एखाद्याला टोकाचं पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त तर करत नाहीत ना, याचा विचार करा. आज मला स्वत:ला भारताची लेक म्हणताना लाज वाटत आहे.’ असे म्हणत तिने ट्रोल करण्याऱ्याना कडक शब्दात सुनावले आहे.

तसेच तिने सिदार्थ शुक्ला याच्या निधनाबाबत व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडोओ बाबत भाष्य केले आहे. ‘कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर काल्पनिक बातमी देण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिलेत? तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या आयुष्यावर जो काही परिणाम होतो, त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात का?’

‘एखाद्या स्त्रीने नुकताच तिचा मुलगा किंवा प्रियकर गमावला असेल तरी तुम्ही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढता, हे सगळं फक्त तुम्ही तुमच्या टीआरपीसाठी करता. पाहिजे ते वृत्त किंवा हवं ते हेडिंग देत तुम्ही कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का देऊ शकता. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि हे जमणार नसेल तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटली पाहिजे,’ असं मुनमुनने या संपूर्ण पत्रात म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या