मुंबई : एकनाथ शिंदे गटातील राज्याचे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर वक्तव्य केले आहे. शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे पक्षातून गेले आहेत तो पालापाचोळा होता तो निघून गेला. यावर आता देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे याबद्दल नेहमीच आदर भावना आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये, असे वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केले आहे.
शिवसेनेत मोठा बंड झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच समोर येऊन मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी भाजप सह एकनाथ शिंदे व इतर बंडखोर आमदारांवरही चांगलीच सडकून टीका केली. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी म्हटले की, “उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संजय राऊतांची भाषा बोलू नये. अडीच वर्षात महाविकास आघाडीत आमची कोंडी झाली. उद्धव ठाकरेंबद्दल आदाराची भावना त्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये” अशा शब्दांत शंभूराजे देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आहे. शिवसेनेतील आमदार व कार्यकर्ते राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. शिवसेना पोखरण्याचे काम सुरू होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठीच आम्ही ही पावलं उचलली. असेही देसाई म्हणाले.
शिवसेनेतून बाहेर पडून वेगळे झालेल्या आमदारांना उद्देशून बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पानं सगळं झाडाकडून घेऊनही गळून पडत आहेत. झाड आता उघडंबोडपं झालंय असं दाखवायचा ते प्रयत्न करत आहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | सरकार स्थापन होऊन १ महिना झालं तरी मंत्रिमंडळ बाळंत होईना – संजय राऊत
- Sanjay Shirsat : उद्धव ठाकरे सुद्धा शिवसेना प्रमुख होऊ शकत नाहीत; संजय शिरसाट यांचं गंभीर विधान
- Uddhav Thackeray | राणे आणि भुजबळ जे करू शकले नाहीत ते शिंदेंनी कसे केले ? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
- 5G Spectrum | पहिल्यांदाच अंबानी-अदानी समोरासमोर; 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू
- Shahjibapu Patil : संजय राऊतांचे पाऊल आमच्या छाताडावर यायच्या आत त्यांच्या डोक्यावर आम्ही पाय देऊ – शहाजीबापू पाटील
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<