Share

Shambhuraj Desai | “बेळगाव दौरा अद्याप तरी रद्द केलेला नाही”, शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण

Shambhuraj Desai | मुंबई : सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी नेमण्यात आलेले समितीचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, अचानक दौरा रद्द झाला. त्यामुले राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणा आलं आहे. यावर शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी, सीमाभागातील बांधवांकडून आम्हाला आग्रह करण्यात आला होता, की ६ डिसेंबर रोजी महापरीनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनाचा कार्यक्रम, आपल्या मराठी बांधवांनी बेळगावमध्ये आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही दोन्ही मंत्र्यांनी ३ ऐवजी ६ तारखेला यावं, त्यानुसार आम्ही आमचा ६ तारखेचा दौरा निश्चित केलेला असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

तसेच, आम्ही येणार आहोत असं कर्नाटक सरकारला अधिकृतरित्या कळवलेलं आहे, परंतु दौऱ्याबाबत विस्तृत माहिती दिलेली नाही. सध्या तरी हा दौरा अधिकृतरित्या रद्द केल्याचं कळवलेलं नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांशी चर्चा करून आम्ही दोघेही त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेणार आहोत, असं देखील देसाी म्हणाले.

दरम्यान, याबाबत सांगताना, आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सीमावादासंदर्भात सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. यासंदर्भात कर्नाटक आणि महाराष्ट्र निर्णय घेऊ शकत नाही. राज्याने अत्यंत ताकदीने कोर्टात आपली भूमिका मांडली असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Shambhuraj Desai | मुंबई : सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी नेमण्यात आलेले समितीचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now