Shambhuraj Desai | मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी काल राज्य सरकारवर सडकून टीका केली. जमत नसेल तर मी सरकार चालवतो असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यावर आता शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर देत ठाकरेंना टोला लगावला आहे.
“उद्धव ठाकरे कोणत्या आंदोलनात सामील झाले? 1997 पासून एकही मोर्चा आंदोलनात एकही पोलीस केस आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर दाखल झाली नाही. अडीच वर्षातली सव्वादोन वर्षं तुम्ही ऑनलाईन सरकार चालवलं. चार लोकांना घेऊन तुम्ही सरकार चालवलं. त्याच्याविरोधात उद्रेक झाल्यामुळे तुम्हाला सत्तेतून जावं लागलं. त्यातून आलेल्या नैराश्यातून ही वक्तव्यं होत आहेत”, असं म्हणत शंभूराज देसाई यांनी टीका केलीय.
“उद्धवसाहेब दिल्लीला जाऊन कोणाकोणापुढे वाकले 2.5 वर्षात हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे सरकार चालवण्याची भाषा उद्धव ठाकरेंच्या तोंडात शोभत नाही.” अशा शब्दांमध्ये मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय.
पुढे ते म्हणाले, महापरिनिर्वाणदिनाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही बेळगावला गेलो नाही. आमचं सरकार ताठ कण्याचं आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने कर्नाटकात जात होतो मात्र तिथल्या सरकारने याला चुकीचं वळण दिलं. कर्नाटक सरकारने चुकीची भूमिका घेतली, असं मत मंत्री शंभुराज देसाई यांनी मांडलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | शंभूराज देसाईंविषयी प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “मी अशा लहान लोकांबाबत…”
- Jitendra Awhad | मराठी माणूस षंढ आहे, असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी समजू नये – जितेंद्र आव्हाड
- Ajit Pawar | “राज्यपालांना पदावरून हटवले तरी…” ; अजित पवार यांची घोषणा
- Sudhir Mungatiwar | “कर्नाटक सरकारने अशा गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी”, सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा
- Sharad Pawar | “येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही तर…”; शरद पवारांचा इशारा काय?