Shambhuraj Desai | मुंबई : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाने उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे तणावाच्या भीतीने महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावचा दौरा रद्द केला. यावर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेनंतर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
“मोठ्याने बोलायचं, बाह्या सावरून बोलायचं, ही राऊत यांची पद्धत बोलायची कुणीही सहन करणार नाही. संजय राऊत तोंड आवरा. साडे तीन महिन्यांचा आराम करून आलायत. तुमच्या बडबडण्यावरून बाहेरचं वातावरण तुम्हाला सुट होत नाही. पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, अशी वक्तव्य टाळावीत”, असा टोला शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी लगावला.
संजय राऊतांचं वक्तव्य काय?
संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुर्चीवर बसून महाराष्ट्राचा अपमान पाहत आहेत. महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल. मंत्री डरपोक आहेत.ते कर्नाटकात कधी जातात, याची आम्ही वाट पाहत आहोत. हे डरपोक लोक आहेत. मंत्र्यांचे काय घेऊन बसला आहात. कर्नाटकातून यांना खलिता आला येऊ नका. यांची हातभर फाटली. यांनी जायला पाहीजे होतं. मंत्र्यांनी धाडसाने जायला पाहीजे होतं. कसला कायदा-बियदा सांगत आहात. आमच्या गाड्या फोडल्या ते कायद्यात बसते का?, बेळगाव-कारवार हा महाराष्ट्राचा भाग आहे. आमच्या बापाचा आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Skin Care Tips | चेहऱ्यावरील पांढरे डाग दूर करायचे असतील, तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Udyanaraje Bhosale | “प्रत्येकाची बुद्धी…”; ‘त्या’ वक्तव्यावरून उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार
- Sanjay Raut | “दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला शक्य नाही”; संजय राऊतांचे गंभीर आरोप
- Aryan Khan | बॉलीवूड करिअरबाबत आर्यन खानने केली मोठी घोषणा, म्हणाला…
- Strep A Infection | UK मध्ये 6 मुलांचा बळी घेणारे स्ट्रेप ए इन्फेक्शन म्हणजे नक्की काय? जाणून घ्या