Shambhuraj Desai | मुंबई : सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. निवडणुकांचं वारं राज्यात घुमू लागलं असल्यामुळे सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर सतत टीका करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शिंदे-भाजप (Shinde-BJP Government) सरकारवर टीका केली. त्याच्या वक्तव्याला राज्याचे उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत आलं की लोकशाही टिकते. त्यांनी सत्तेतून पायउतार झालं की, लोकशाहीला धोका निर्माण होतो. मात्र, लोकशाही मार्गानेच विधानसभेत बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन झालं. लोकशाहीतूनच विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
तसेच, बहुमताचा आदर केला पाहिजे, त्यालाच महत्व आहे. रामराजेंचा पक्ष आता सत्तेत नाही, ही त्यांची खंत आहे. राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यामुळे सत्तेविना ते तळमळत आहेत. पण, त्यांना अडीच नाहीतर पुढील दहा-पंधरा वर्षे सत्तेविना तळमळत राहावं लागणार असल्याचं म्हणत शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीवर चांगलाच हल्ला केला आहे.
दरम्यान, राज्यात सुरु असलेलं राजकारण हे लोकशाहीला घातक आहे. यातून लोकशाही टिकणार नाही. यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पर्याय म्हणून समोर आलं पाहिजे. तरच लोकशाही टिकेल, असं वक्तव्य निंबाळकर यांनी केलं होत.
महत्वाच्या बातम्या :
- MNS | “आमची मनं जुळली आहेत, बाकी सर्व जुळून येईल”
- Irfan Pathan । ‘विराटने फटाके तर कालच फोडले होते’; इरफान पठाणने शेअर केला व्हिडिओ
- IND vs PAK । फलंदाजी करताना मला खूप दडपण जाणवत होते, विराट कोहलीने केला मोठा खुलासा
- Ramdas Athawale। आम्हाला मनसेच्या युतीची गरज नाही; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ
- Ravi Rana । “मी फडणवीसांचा सच्चा शिपाई आहे, त्यामुळे मी त्याला भीक घालत नाही”; रवी राणांची बच्चू कडूंवर सडकून टीका