Share

Shambhuraj Desai | ‘निवडणूक आयोगाने झुकतं माप दिलं’, ठाकरे गटाच्या आरोपावर शंभूराज देसाई म्हणाले…

मुंबई : सध्या राज्यातील राजकीय वतावरण चांगलंच गरम झालेलं पाहाया मिळतं आहे. पोट निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव दिलं आहे. ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिलं आहे. तर शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’. परंतू ठाकरे गटाने यासंबंधी निवडणूक आयोगावर नाव आणि चिन्ह देताना झुकतं माप दिलं असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. अशातच ठाकरे गटाच्या या आरोपावर शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शंभूराज देसाई ?

त्यांच्या (उद्धव ठाकरे गटाच्या) बाजूने निर्णय लागला की सगळ्या यंत्रणा योग्य आणि विरोधात गेला की आमची माहिती दुसऱ्यांना दिली, अशी आरडाओरड करतात. यामध्ये काही तथ्य नाही, असं म्हणत शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे गटांवर पलटवार केला आहे. शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. घटनेने, कायद्याने त्यांना अधिकार दिले असून, त्या कक्षेतच राहून ते काम करत असतात. ते अशाप्रकारे माहिती उघड करणार नाहीत.

ठाकरे गटाने 12 मुद्यांचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले आहे. त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने निर्णयात पक्षपातीपणा केला असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने केलेल्या आरोपवरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही ठाकरे गटावर टीका केली आहे. ते म्हणाले की, दोन दिवस मशालीच्या बाजूनं उदो-उदो केला, मिरवणुका काढल्या, उत्सव साजरा केला आणि आत्ता हे चुकीचं केल्याचं तुम्हाला वाटत आहे.
महत्वाच्या बातम्या :

मुंबई : सध्या राज्यातील राजकीय वतावरण चांगलंच गरम झालेलं पाहाया मिळतं आहे. पोट निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now