‘भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’

shalini thackeray

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण आणि खेडमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. चिपळूण बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी एका महिलेनं मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत काही करा पण आम्हाला उभं करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही महिलेचं म्हणणं ऐकून धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार भास्कर जाधव यांच्या आरेरावीमुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यांचं वागण्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं. मात्र नेमकं त्याचवेळी भास्कर जाधव यांनी महिलेला “आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय, तुझा मुलगा कुठंय??? तुझ्या आईला समजव” अशी प्रतिक्रिया दिली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिलाय. ‘भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उघारलाय ना.? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,’ असं शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या