‘…यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच’

raj thackaray at shivtarth sabha

मुंबई : ‘माझं ते वक्तव्य हिंदूविरोधी नाही. मी खरा देशभक्त आहे. मात्र राजकीय षडयंत्र करुन माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मी जे काही बोललो त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते वक्तव्य मागे घेतो असं म्हणत ए आय एम आय एम या पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी कर्नाटकातल्या गुलबर्गा येथे केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.

याच पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी वारिस पठाण यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विट करत शालिनी ठाकरे म्हणतात, ‘मनसेच्या दणक्याला घाबरून हिंदूंचा अपमान करणारे वक्तव्य एमआयएमचे नेते वारीस पठाण ह्यांनी मागे घेतले! अशा नौटंकीबाजांना वठणीवर आणण्यासाठी महाराष्ट्रात माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांची दहशत हवीच!! अन्यथा ह्यांची थोबाडं वटवट करतच राहतील,’ असे शालिनी ठाकरे म्हणाल्या.

Loading...

तसेच याचाच धागा पकडत माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील, असं मुनगंटीवार म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘वारिस पठाण यांनी माफी मागितली असती, तर बरं झालं असतं, असं म्हणत जनता त्यांना माफ करणार नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले. तसेच वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील, असं म्हणत मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांना लक्ष्य केलं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका