महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शालिनी ठाकरेंचे गृहमंत्र्यांना निवेदन

shalini thakre

मुंबई : राज्यात महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नुकत्याच घडलेल्या साकिनाका बलात्कार प्रकरणानानंतर राज्य सरकारवर टीकास्त्रांचा वर्षाव होतांना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत त्यांना एक निवेदन दिले आहे. निवेदनामधून महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात बोलत असतांना शालिनी म्हणाल्या की,‘पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख सांगणाऱ्या आपल्या राज्याची राजधानी मुंबईमधील साकीनाका येथे नुकतेच एका ३४ वर्षीय महिलेवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला. या घटनेतील आरोपीने क्रौर्याची परिसीमा गाठली. गेल्या काही दिवसांमध्ये महिला आणि लहान मुलीवर होत असलेले बलात्कार, मारहाण, हत्या, लैंगिक शोषण अश्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. साकीनाका, वसई, अमरावती, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर येथे एकापाठोपाठ एक महिलावर अत्याचार आणि बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. सुरक्षित राज्य अशी ओळख असलेले आपले महाराष्ट्र राज्य ही ओळख गमावून बसतो की काय अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या बाहेरून आलेले विकृत मानसिकतेची लोकं यातील बहुतांश घटनांसाठी जबाबदार आहेत. दुसरीकडे अशी कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचा पोलिसांबद्दलचा धाक नाहीसा झालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाच गंभीर्य लक्षात घेऊन आपण तातडीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.’ याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागण्या करण्यात आल्या आहे.

दरम्यान, आपण यापूर्वी घेतलेले अनेक निर्णय राज्यासाठी पथदर्शी ठरले आहेत. अशात आपल्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात साकीनाक्यासारखी घटना घडणे हे निश्चितच भूषणावह नाही. त्यामुळेच आम्ही केलेल्या सर्व मागण्यांचा आपण पूर्ण विचार कराल, आणि महिलांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी सर्व स्तरातील पोलीस अधिकाऱ्यांना उचित निर्देश द्याल हीच अपेक्षा बाळगत असल्याचेही यावेळी शालिनी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या