व्वा रे व्वा! तुम्ही ज्या खात्याचे मंत्री बनणार, त्या खात्याचा ‘वेगळा’ अर्थसंकल्प तुम्हाला आवश्यक वाटतो, पण…

मुंबई : ठाण्यातील उपवन तलाव परिसरात ‘संस्कृती आर्ट फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात आले होते. गेली चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हल मध्ये अनेक मान्यवरांनी तसेच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. आदित्य ठाकरेंनी ठाण्यातील ‘संस्कृती आर्ट फेस्टिवल’ला हजेरी लावली.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, ‘मुंबई शहरात सुरू केलेल्या नाइट लाइफला कसा प्रतिसाद मिळतो, याबाबत आढावा घेतल्यानंतरच ही संकल्पना ठाण्यात राबविण्याचा विचार करू. तसेच आमदारांच्या मागण्या विचारात घेता पर्यटन खात्यासाठी वेगळा अर्थसंकल्प असावा,’ असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

Loading...

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला आहे. याबाबत ट्विटकरत त्या म्हणतात, ‘तुम्ही ज्या खात्याचे मंत्री बनणार त्या खात्याचा वेगळा अर्थसंकल्प आवश्य वाटतो पण महिलांच्या अधिकारांसंदर्भातील अर्शसंकल्प गरजेचा वाटत नाही,” असा सवाल शालिनी ठाकरेंनी ट्विटवरुन लगावला आहे.

दरम्यान, ‘व्वा रे व्वा! तुम्ही ज्या खात्याचे मंत्री बनणार, त्या खात्याचा ‘वेगळा’ अर्थसंकल्प तुम्हाला आवश्यक वाटतो पण महिलांच्या न्याय्य अधिकारांबाबत विशेष अर्थसंकल्प, जेंडर बजेट सादर करून त्वरित अंमलबजावणी करणं तुम्हाला गरजेचं वाटत नाही.” तसेच तुमच्या या ‘अनास्थेचा हिशोब’ महिलांना मांडावाच लागेल,’ असे त्या म्हणाल्या.

वाचा नेमकं काय म्हणाले होते आदित्य ठाकरे

“पर्यटन विभागात आधी उत्साह नव्हता. मात्र, माझ्याकडे खाते आल्यानंतर या विभागात उत्साह आल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने ग्रामीण आणि शहरी भागात जी कामे हाती घेतली आहेत, ती उत्तम आणि दर्जेदार करण्यात येणार आहेत,” असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?