चक्क सलमानच्या बंगल्यात राहत होता अट्टल गुन्हेगार

टीम महाराष्ट्र देशा : सलमान खानच्या गोराई येथील बंगल्यात केअर टेकर म्हणून राहणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला कालमुंबई पोलिसांनी अटक केली. शक्ती सिद्धेश्वर राणा असं त्याचं नाव आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून तो या बंगल्यात नोकर म्हणून राहात होता. २९ वर्षापूर्वी घडलेल्या एका घटनेतील तो आरोपी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या वरळीत १९९० मध्ये घडलेल्या एका घटनेत शक्ती राणाला पोलिसांनी अटक केली होती. घरात घुसून मारहाण करणं आणि सामानाची लुटमार करणे असा त्याच्यावर आरोप होता. त्यानंतर न्यायालयातून त्याला जामीन मिळाल्यानंतर तो कधीच सुनावणीसाठी हजर राहिला नाही.

पोलीस या प्रकरणाचा शोध घेत राहिले मात्र शक्ती हा फरार झाला तो सापडलाच नाही. खाब्र्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. एखाद्या चित्रपटाचा सीन वाटावा अशी ही घटना आहे.

दरम्यान, चौकशी करताना हा बंगला सलमान खानचा असल्याची माहिती पोलिसांना कळाली. तो इथे आपली खरी ओळख लपवून केअर टेकर म्हणून राहत होता. रानाला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस तो इतर कुठल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे का, त्याचे इतर साथीदार आहेत का याचा शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या