शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी हाय कोर्टाचा धक्कादायक निर्णय

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी हाय कोर्टाचा धक्कादायक निर्णय

मुंबई: मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल (Shakti Mill rape case) कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ ला एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरले होते. छायाचित्रकार असणारी महिला आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापची लाट उसळली होती. पोलिसांनी याप्रकरणी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) या आरोपींपैकी सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपींनी मुंबई हाय कोर्टाने ४ डिसेंबर २०१४ ला या सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंबंधीचा निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला होता. यावर आज सुनावणी करण्यात आली आहे.

आज या बलात्कार प्रकरणी निर्णय सुनावताना हाय कोर्टाने आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेने समाजाला खूप मोठा धक्का दिला. बलात्काराची प्रत्येक घटना ही खूप मोठा गुन्हा आहे. यामुळे फक्त शारिरीक नाही तर मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. पीडितेच्या सन्मानावर हा हल्ला असतो. पण घटनेवर चालणारं कोर्ट लोकांच्या मतांच्या आधारे शिक्षा ठरवू शकत नाही. नियमाप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा असून, फाशी हा एक अपवाद असल्याचे मुंबई हाय कोर्टाने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या: