लंडन : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. कोरोनाच्या महामारीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक वैज्ञानिकांनी रात्रंदिवस मेहनत करून लस शोधून काढली. पुढे कोरोना लशीच्या वापरासाठी मंजुरी मिळाल्यानंतर जगात पहिल्यांदा करोना लशीचा डोस घेणारे पुरुषांमध्ये विल्यम शेक्सपियर यांना देण्यात आला होता. आज याच विल्यम शेक्सपियर यांचे दुखद निधन झाले आहे.
विल्यम शेक्सपियर उर्फ बिल शेक्सपियर यांनी मंगळवारी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.शेक्सपियर यांना दुसऱ्या एका आजाराने ग्रासलं होतं. आजारपणामुळे त्यांचे निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. शेक्सपिअर यांच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि नातवंड असा परिवार आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फायजरची लस देण्यात आली होती. त्यांच्या अगोदर काही मिनिटे युनिव्हर्सिटी रुग्णालयाने 91 वर्षीय मार्गारेट कीनन यांना लस दिली होती. ज्या युनिव्हर्सिटी हॉस्पीटल कॉनव्हेंट्रीमध्ये शेक्सपिअर यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी करोनाची लस घेतली त्याच रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
शेक्सपिअर हे रोल्स रॉयस कंपनीचे माजी कर्मचारी होते. डिसेंबरमध्ये शेक्सपिअर यांनी लस घेतली होती. त्यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केलं होतं. शिवाय रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळाल्याचं देखील सांगितलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- जे कामे केंद्राचे आहेत ते राज्य कशी करणार? ; केजरीवालांचा संतप्त सवाल
- ‘ कोरोनाला हरवू, नंतर आरक्षण मिळवू’, आ.मेटेंच्या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध
- यंदा नालेसफाईच्या उधळपट्टीला ब्रेक, मनपाने तोडली ठेकेदार आणि कंत्राटदार साखळी!
- पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी; जयंत पाटील यांचा केंद्रावर हल्लाबोल
- शेतकरी थकेल आणि आंदोलन संपेल हा मोदी सरकारचा गैरसमज : मलिक