‘बेडरूमपर्यंत जा, पण त्याला बेड्याच ठोका’ हा मुरकुटेचाचं आदेश, गडाखांचा घणाघात

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून विधानसभा निवडणुका देखील दुष्टीक्षेपात असताना नेवासा तालुक्यातील राजकारण आता चांगलेच तापले आहे. एकमेकांचे कट्टर राजकीय दुश्मन समजले जाणारे माजी आमदार गडाख आणि आमदार मुरकुटे हे एकमेकांवर वार करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. दरम्यान, मुळा एज्युकेशन संस्थेबाबत हरित लवादाचा निर्णय, गडाखांचे अटक वॉरंट प्रकरण व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार शंकरराव गडाख यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

“शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रास्ता रोको’ केला म्हणून नाही, तर सूडबुद्धीचे राजकारण म्हणून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पोलिसांना थेट याच्या बेडरूमपर्यंत जा, पण त्याला बेड्याच ठोका’ असा आदेश दिल्यानेच माझ्या घराची झडती झाली,” असा आरोप माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केला आहे.

सोनईत झालेल्या मेळाव्यात गडाख यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. “नगरचा गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे एक प्रकारे गुंडांचीच टोळी आहे,’ असा आरोप करून गडाख म्हणाले, “सर्च वॉरंट नसताना गुन्हे अन्वेषण पथकाने बंधू प्रशांत व विजय यांना आरोपींप्रमाणे वागणूक दिली. वडिलांना पोलिसी खाक्या दाखविला. तर , आम्हाला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार आमदार मुरकुटे यांच्या इशाऱ्यावरूनच झाला आहे. असा घणाघात देखील शंकरराव गडाख यांनी केला आहे.