शाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ

तुळजापूर- कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवराञ उत्सवास दुर्गा अष्टमीस सोमवार दि १४ रोजी दुपारी बारा वाजता मंदीरात घटस्थापना करण्यात येवुन प्रारंभ झाला.

रविवार दि6 जानेवारी 2019रोजी निद्रस्त करण्यात आलेली तुळजाभवानी मुर्ती सोमवार पहाटे चांदी सिंहासनावर अधिष्टीत केली गेली .त्यानंतर देवीस भाविकांचे दही,दुध,पंचामृत अभिषेक पुजा करण्यात करण्यात आले.ते संपल्यानंतर देवीजीस वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर देवीजींची नित्योपचार पुजा करण्यात आली.नंतर पुनश्च सकाळी सहा वाजता देवीजीस भाविकांचे अभिषेक करण्यात आले.ते संपल्यानंतर देवीस वस्ञोलंकार घालण्यात आले.त्यानंतर दुपारी बारा वाजता आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे च्या गजरात संभळाचा कडकडाटात घटस्थापना करण्यात आली.

यावेळी देवीचे मंहत तुकोजीबुवा, मंहत हमरोजी बुवा आजच्या देवीच्या पुजेचे मानकरी दिंगबर पाटील प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार राहुल पाटील, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, दिलीप नाईकवाडीसह सेवादार, पुजारी, मानकरी उपस्थितीत होते .राञी दहा वाजता मंदीर प्रागणांत छबिना काढण्यात आला.शाकंभरी नवराञउत्सवातील पहिल्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.