शैलजादेवी जयंत पाटील यांच्या मातृत्वाच्या ओलाव्याने पूरग्रस्त शेतमजूर कुटुंब गहिवरले

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – सांगली आलेल्या महापुरामुळे दोन्ही जिल्ह्यात हलाकीची परिस्थिती आहे. अनेक नागरिक अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांसाठी संपूर्ण राज्यातून मदत केली जात आहे. अनेक नेत्यांनी वैयक्तिक स्तरावर देखील मदत केली आहे. त्यापैकी एक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पूरग्रस्तांसाठी स्वतः ला वाहून घेतले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीय देखील आपल्यापरिने जमेल तेवढी मदत करत आहेत. अशीचं मदत जयंत पाटील यांच्या पत्नीने म्हणजे शैलजादेवी पाटील यांनी केली आहे.

कोल्हापूर सांगलीत आलेल्या महापुरामध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. खासकरून महिलांचे आणि बाळंतीण महिलांना महापुराचा सामना करावा लागला आहे. असाच सामना औदुंबर येथील सौ. माया संतोष माने या नुकत्याचं बाळंतीण महिलेला सहन करवा लागला. महापूर येताचं माया माने यांच्या आईने मोठ्या धाडसाने बाळास बोटीने विठ्ठलनगर येथे घेवून आल्या आणि आष्टा येथील मा.विलासराव बहुउद्धेशिय हॉल गाठला. येथे आष्टा येथील कार्यकर्त्यांनी त्यांची रहाणे,व जेवणाची व्यवस्था केली.

Loading...

मात्र शैलजादेवी पाटील यांनी स्वतः जाऊन विलासराव बहुउद्धेशिय हॉलमध्ये पूरग्रस्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लहान मुले,व वृद्धांना शाली,तर महिलांना साड्या वाटप केले. यावेळी त्यांची माया, व तिच्या कुटुंबाशी भेट झाली. त्यांनी लगेच माया,तिचे बाळ,व आईस आपल्या स्वतःच्या गाडीतून कारखाना कार्यस्थळावर आणले. त्यांनी माया यांची राहण्याची ,व जेवणाची व्यवस्था केली. इतकेचं काय तिच्या बाळासाठी नवा पाळणा आणायला लावला असून तिला गरम पाणी देण्याची व्यवस्था केली. माया हिचे वडील औदुंबर येथील विश्वास पाटील यांच्याकडे शेतमजुरी करतात. माया ही आपल्या माहेरी बाळंतपणास आली होती. नुकतेच तिचे बाळंतण झाले असून तिच्या पुढे महापूर आ वासून उभा राहिला.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण