मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) पुढच्या वर्षी त्याच्या ‘पठाण’ (Pathan) चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. त्याचबरोबर चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपट ‘जवान’ (Jawan) ची देखील खूप उत्सुकता लागली आहे. या चित्रपटांमध्ये शाहरुख खान अनेक तमिळ हिट्स देणाऱ्या दिग्दर्शिका अॅटलीसोबत काम करणार आहे. तर दुसरीकडे KGF आणि कांतारा सारखे हिट दिल्यानंतर होम्बले फिल्म्स बॉलीवूडमध्ये आपले पंख पसरवण्यासाठी सुसज्ज आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या प्रोडक्शन हाऊसने शाहरुख खानला त्यांच्या पहिली हिंदी चित्रपटासाठी संपर्क साधला आहे. होम्बले फिल्म्स सध्या प्रभासचा आगामी चित्रपट ‘सालार’ बनवण्यात व्यस्त आहे. रिपोर्टनुसार, हे प्रोडक्शन हाऊस आता साउथ व्यतिरिक्त बॉलीवूडमध्ये ही आपल्या पाऊलखुणा वाढवणार आहे.
मीडियामध्ये सध्या होम्बले फिल्म्स आणि शाहरुख खान यांच्या प्रोजेक्ट बाबत चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ॲक्शन फिल्ममध्ये शाहरुख खानसह रोहित शेट्टी देखील या चित्रपटाचा भाग असणार आहे. होम्बले फिल्म्सच्या पहिल्या बॉलीवूड चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रोहित शेट्टीवर सोपवण्यात आली आहे. शाहरुख खान रोहित शेट्टी ही धमाकेदार जोडी आधी चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटांमध्ये दिसली होती. शाहरुख खानसोबत होम्बले फिल्म्सच्या आगामी चित्रपटांमध्ये कांतारा चित्रपटातील सुपरहिट हिरो ऋषभ शेट्टी देखील दिसू शकतो.
सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘पठाण’ची जोरदार तयारी करताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसह दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.
त्याचबरोबर शाहरुख खान दक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्यासोबत ‘जवान’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर शाहरुख खान ‘डंकी’ या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Hair Care Tips | केसांची वाढ आणि निगा राखण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे सेवन
- Mahaparinirvan Diwas | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिवस का साजरा केला जातो?, जाणून घ्या
- Cloves | हिवाळ्यात रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- T-20 World Cup | टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी युवा महिला संघाचे नेतृत्व करणार शेफाली वर्मा
- Uddhav Thackeray | “सरकार चालविण्यापासून ते…”, उद्धव ठाकरेंची सरकार चालवण्याची तयारी