‘जागो मोहन प्यारे’चा ‘राहुल’ भेटला बॉलीवुडच्या ‘राहुल’ला

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता शाहरूख खानने आपल्या 9 बॉलीवूड सिनेमांमध्ये राहुलची भूमिका रंगवलीय. डर, जमाना-दिवाना, येस बॉस, दिल तो पागल हैं, कुछ कुछ होता हैं, हर दिल जो प्यार करेगा, कभी खुशी कभी गम, चैन्नई एक्सप्रेस आणि फॅन ह्या सिनेमांमधल्या राहुलला किंगखानचे चाहते विसरूच शकत नाहीत. किंबहुना राहुल ह्या नावाला ग्लॅमर लाभलं ते बॉलीवूडच्या ह्या बादशाहमुळेच.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दुस-या पर्वाचा विजेता अभिनेता पृथ्वीक प्रतापनेही ‘जागो मोहन प्यारे’ ह्या मालिकेत राहुलची भूमिका रंगवली होती. ह्या मराठी मालिकेतल्या राहुलला नुकतीच बॉलीवुडचा बादशाह असलेल्या राहुलला भेटायची संधी मिळाली. पृथ्वीकने ही फॅनमोमेंट कॅमे-यात कॅप्चर केली आहे. आणि आपला शाहरूख खानसोबतचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे.

Loading...

हा फोटो टाकताना पृथ्वीकने म्हटलंय, “आज मै जो कुछ भी हु.. बस आप के वजह से हु! लाइफ रिस्क पे लगादी आप से मिलने के लिये. अ ड्रीम कमिंग ट्रू”

ह्या भेटीविषयी पृथ्वीक प्रतापला विचारल्यावर तो म्हणाला, “ शाहरूख खानचा एक डायलॉग आहे, ‘इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशीश की हैं’ …. माझ्याबाबतीत अगदी तेच घडलंय. सिनेसृष्टीत काम करणा-या प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते. की बॉलीवूडच्या ह्या किंगला एकदा तरी भेटावं. ती इच्छा पूर्ण होणं, हे स्वप्नवत होतं.”

ही भेट कशी झाली? येत्या काळात शाहरूखसोबत काही प्रोजेक्ट होणार आहे का? असं विचारल्यावर पृथ्वीक म्हणतो, “शाहरूख खानसोबत काम करायला कुणाला नाही आवडणार. पण ह्याविषयीचा खुलासा मी लवकरच करीन. सध्या ह्याविषयी जास्त बोलणं शक्य नाही.”

मोदी अमिताभपेक्षा ही चांगले अॅक्टर राहुल गांधीचा मोदींना टोला

नवनीत राणा यांचा दिलदारपणा; पहिला पगार दिला दुष्काळग्रस्तांसाठी

‘ये मोहब्बद भी क्या चिज है, ना जिने देती है ना मरने’… उत्तकपत्रिकेतच लिहिली प्रेमकथा

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले