शाहरुखने केली सचिनची बरोबरी

क्रिकेटमध्ये सचिन तर बॉलीवूडमध्ये शाहरुख… दोघांचीही नाव मोठी.. दोघेही जगात सुप्रसिद्ध… तरीही दोघांमध्ये प्रसिद्धीसाठी कोणतीही स्पर्धा नाही. तरीही काल बॉलीवूड किंग शाहरुख खानने सचिनच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आजपर्यन्त ३ प्रकारच्या वेगवेगळ्या खेळांच्या लीगमधील संघांची सहमालकी आहे. २०१४ साली इंडियन सुपर लीगची सुरुवात झाली.सचिन यातील केरला ब्लास्टर्स फुटबॉल क्लब संघाचा सहमालक आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील बांगा बिट्स संघाचा २०१६ पासून सचिन सहसंघमालक आहे तर अगदी ह्या वर्षी प्रो कबड्डीमध्ये नवीन ४ संघ आले त्यातील तामिळ थलाइवा संघाचा सचिन सहमालक आहे.

किंग खानही यात अजिबात मागे नाही. क्रिकेट या खेळातील तीन उपखंडात होणाऱ्या वेगवेगळ्या ३ संघांची सहमालकी शाहरुख खानकडे आहे. काल शाहरुख खानने टी२० ग्लोबल लीगमधील केप टाउन संघ विकत घेतला. यापूर्वी आयपीएल मधील कोलकाता नाइट रायडर्स संघाची तसेच कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिबंगो नाइट रायडर्स संघाची सहसंघमालकी शाहरुख खानकडे होती.

अशा प्रकारे आता या दोनही दिग्गजांच्या नावावर ३-३ संघाची मालकी आहे. त्यात सचिनकडे तीन वेगवेगळ्या खेळातील तर शाहरुखकडे तीन वेगवेगळ्या खंडातील संघांची मालकी आहे.