fbpx

सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांनी स्वप्नात सर्जिकल स्ट्राईक केले असेल : हुसेन

टीम महाराष्ट्र देशा : सर्जिकल स्ट्राईक आम्ही देखील केले होते मात्र आम्ही त्याचा गाजावाजा केला नाही असं नुकतंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच माजी केद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं होतं. पवार-शिंदे यांच्या या वक्तव्याचा भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी चांगलाच समाचार घेतला. सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांनी स्वप्नात सर्जिकल स्ट्राईक केले असेल असं म्हणत हुसेन यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी पुण्याचे भाजपाचे उमेदवार गिरीश बापट, शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, खासदार अनिल शिराेळे, महापाैर मुक्ता टिळक आदी यावेळी उपस्थित हाेते.

दरम्यान, देशातील ६००  कलाकार एकत्र येत त्यांनी भाजपाच्या विराेधात मतदान करा असे आवाहन केले आहे. यात ज्येष्ठ दिग्दर्शक अमाेल पालेकर यांच्याबराेबरच अभिनेते नसरुद्दीन शहा यांचा सहभाग आहे. या ६०० कलाकारांची मते विराेधात गेली तरी भाजपाला फरक पडत नसून भाजपाच्या बाजूने चाैकाचाैकात 6000 मतदार उभे राहतील अशी टीका हुसेन यांनी कलाकारांवर केली.