Shahjibapu Patil । पुणे : शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांचा शिंदे यांना पाठिंबा आहे. मात्र यानंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या विरोधात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे देखील सभा घेत आपली भाजू भक्कमपणे मांडत आहेत. त्यातच आता आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठी टीका केली आहे.
आज पुण्यातील सासवड मध्ये शिंदे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या सभेचे आयोजन केले होते. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा बंडा दरम्यान किस्सा सांगितलं. पाटील म्हणाले कि, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सिल्वर ओकवर होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे अनेक मोठे नेते मुंबईत हजर होते. सगळी पोलीस यंत्रणाही त्या ठिकाणी उपस्थित होती. मात्र आमचे ४० आमदार एक एक करत कधी ठाण्याकडे रवाना झाले हे कुणालाही समजलं नाही. असली यांची यंत्रणा आहे. पेंगत झोपत बसली होती. अन् आम्ही सुरतला पोहचल्यावर हे म्हणायला लागले कि हे कुठं गेले ते बघा. शहाजीबापू पाटील यांचा फोन नॉट रिचेबल. शहाजीबापू फोन वर सापडत नाही. मी माझा बायकोला महिना महिना फोन वर सापडत नाही आणि तुम्हाला कुठं सापडायचो, येड्या का हुडकाय लागलाय, असा टोला शहाजीबापू पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.
दरम्यान, याआधी शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. शहाजीबापू पाटील म्हणाले कि, आदित्य ठाकरे यांच्यावर काही संस्कार केले आहेत की नाही? की लहानपणी ते गल्लीबोळात फिरत होते. आमची गद्दारी नाही तर आम्ही खुद्दारी आहे. उद्धव ठाकरे काही बोलले तर त्यांचे शब्द आमदारांच्या जिव्हारी लागणार नाही. पण आदित्य ठाकरेंसारख्या लहान पोराने असे बोलणं चुकीचं आहे. तसेच आम्ही गद्दार, गटारीतील घाण आहे, तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवताय?, असा प्रश्न त्यांनी विचारलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Alia bhatt | “मी ब्रा का लपवायची?…”; आलिया भट्टच बोल्ड विधान
- Ajit Pawar |”राज्याचे प्रमुख नियम तोडतात, त्यांनी…” ; अजित पवारांचा मुख्यमंत्र्याना टोला
- Ajit Pawar | शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवारांची मिश्किल टीका! म्हणाले…
- Shahjibapu Patil । आम्ही गद्दार, गटारीतील घाण आहोत तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवताय?, शहाजी बापू पाटलांचा आदित्य ठाकरेंना सवाल
- Uday Samant | “जनता मुख्यमंत्र्यांना समर्थन देते त्यामुळे…” ; उदय सामंत यांची प्रतिक्रिया!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<