वीरपत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात दाखल

चेन्नई : अतिरेक्यांशी सामना करताना झालेल्या भ्याड हल्यात . 17 नोव्हेंबर 2015 संतोष महाडिक हे धारातीर्थी पडले. या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही देण्यात आला होता. मात्र याच वेळी वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी खचून न जाता पतीच्या ‘आपल्यासह मुलीही आर्मीतच जातील असा निर्धार केला.

आज पतीच्या निधनावेळी केलेला निर्धार स्वाती यांनी पूर्ण केला आहे वीरपत्नी स्वाती महाडिक आज भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. गेल्या वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर स्वाती महाडिक देशसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. स्वाती महाडिक या प्रशिक्षणार्थींमध्येही अव्वल ठरल्या आहेत. चेन्नईतील ट्रेनिंग सेंटरवर झालेल्या सोहळ्यात ‘बेस्ट कॅडेट’चं पदक त्यांना मिळाल आहे.

चेन्नईतल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतील कार्यक्रमात शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी लेफ्टनंटपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीय चेन्नईत दाखल झालं होतं. गेल्या अकरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यातील देहूरोड इथे होणार आहे.