काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रसंघानं हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या आफ्रिदीवर होतेय चौफेर टीका

टीम महाराष्ट्र देशा- मोदी सरकारने सोमवारी जम्मू-काश्मीरसंबंधी ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारने संसदेत जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही शिफारस मांडली. पीडीपीसह काही खासदारांनी याला आक्षेप घेतल्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. मात्र, सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर सभागृहात या मुद्यावर चर्चा सुरू झाली. चर्चेअंती विधेयकावर चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. त्यानंतर राज्यसभेत बहुमताने हे विधेयक मंजूर झाले.

भारताच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीनं प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघानं हस्तक्षेप करावं असं आफ्रिदीनं म्हटलं आहे. आफ्रीदी म्हणाला की, काश्मीरच्या लोकांना संयुक्त राष्ट्रसंघांच्या प्रस्तावाअंतर्गत त्यांचे अधिकार द्यायला हवेत.

Loading...

भारताने काश्मीरचा निर्णय घेतल्यानंतर आफ्रीदीनं संयुक्त राष्ट्रसंघावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं थेट संयुक्त राष्ट्रसंघावरच प्रश्न उपस्थित करत युएन झोपले आहे का? असा प्रश्न विचारला. आफ्रिदीच्या या ट्वीट नंतर त्याच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

दरम्यान,यापूर्वीही आफ्रिदीने स्वतंत्र काश्मीरचा प्रस्ताव ठेवला होता. लंडनमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तो म्हणाला होता की, पाकिस्तानला काश्मीर नको आहे. भारतालासुद्धा तो देऊ नका. काश्मीरला स्वतंत्र ठेवा. यामुळे मानवता जिवंत राहील. पाकिस्तानला त्याचे चार भाग सांभाळणे कठीण आहे. असे वक्तव्य आफ्रिदीने काश्मीरबाबत केले होते.

#Article370 : लहू था जो लाल मेरा,अब वो है तिरंगे की लहर

#Article370 : ‘भाजपाने राज्यघटनेची हत्या केली’

वीजेवर चालणाऱ्या वाहनांमुळे रोजगार संधी वाढणार – इरिक सोल्हेम

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
स्वतःला प्रबोधनकार म्हणवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी माफी मागावी
शरद पवारांचा नाशिक दौरा रद्द, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक