मुंबई : आयपीएल (IPL)च्या वाढत्या बाजारावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारत ही सध्या क्रिकेटची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि हे सर्व अर्थव्यवस्थेवर अवलंबून असल्याचे त्याने सांगितले. आयपीएल २०२२ दरम्यान स्पर्धेच्या दर्शकांमध्ये घट झाली होती. गेल्या दोन सामन्यांच्या तुलनेत यावेळी टीव्हीवर सामना पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये घट झाली. तथापि, असे असूनही, ई-लिलावादरम्यान आयपीएलच्या मीडिया हक्कांसाठी मोठी रक्कम प्राप्त झाली. टीव्ही हक्क, डिजिटल अधिकार प्रत्येकासाठी रेकॉर्डब्रेक रक्कम मिळाली.
शाहिद आफ्रिदीच्या म्हणण्यानुसार, आयपीएलची बाजारपेठ खूप मोठी झाली आहे आणि त्यामुळे त्याला पूर्ण विंडो मिळत आहे. ”हे सर्व बाजार आणि अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. तुमची सर्वात मोठी बाजारपेठ भारत आहे”, असे आफ्रिदीने म्हटले. बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठीचे मीडिया हक्क मोठ्या रकमेत विकले आहेत. स्टार नेटवर्क टीव्हीचे हक्क राखण्यात यशस्वी ठरले आहे. रिलायन्सच्या वायकॉमने डिजिटल अधिकार विकत घेतले आहेत. रिलायन्सने नॉन-एक्सक्लुझिव्ह मॅचचे हक्कही विकत घेतले आहेत. बोर्डाने एकूण ४८३९० कोटी रुपयांना सर्व मीडिया हक्क विकले आहेत.
बोर्डाला टीव्ही हक्कांसाठी २३५७५ कोटी रुपये मिळाले आहेत. तर वायकॉमने-१८ने २३७५८ कोटींना डिजिटल अधिकार विकत घेतले आहेत. कालावधीत एकूण ४१० सामने कव्हर केले जातील. त्याचबरोबर पैशाच्या बाबतीत आयपीएलने इंग्लिश प्रीमियर लीगला मागे टाकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<