fbpx

गौतम गंभीरच्या विजयी निकालावर पाकिस्तानच्या आफ्रिदीचा जळफळाट

टीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत क्रिकेटर गौतम गंभीर याने देखील आपले हात ओले करून घेतले आहेत.दिल्लीच्या पूर्व दिल्ली मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळवत आणि निवडणूक जिंकत राजकारणात धमाकेदार एन्ट्री मारली आहे. मात्र गौतम गंभीर च्या विजयी निकालावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शहीद आफ्रिदी याने टिका केली आहे.दिल्लीकरांनी एका अक्कल नसलेल्या माणसाला निवडून दिले आहे, अशी टीका आफ्रिदीने केली आहे. आफ्रिदी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होता.

यावेळी आफ्रिदी म्हणाला की, पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत. तसेच विश्वचषकातही पाकिस्तानविरोधात सामना खेळू नये असे गंभीरने म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आफ्रिदीने हे वक्तव्य केले. ”असे विधान गौतम गंभीरने केले असेल तर त्याच्या अकलेवरून वाटतं का त्याने कुठली शहाणपणाची गोष्ट केली आहे, असे वाटते का? सुशिक्षित लोक अशी वक्तव्ये करतात का? त्याने केलेले वक्तव्य मुर्खपणाचे आहे आणि लोकांनी अशा व्यक्तीला मतदान केले आहे, ज्याला अक्लल नाही.

दरम्यान क्रिकेटच्या मैदानावरील गौतम गंभीरची कामगिरी ही साऱ्यांना माहित आहे, तसेच आता राजकारणाच्या मैदानात देखील त्याने सफाईने यश संपादन केले आहे. त्यामुळे त्याचा प्रतिस्पर्धी आणि पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटर शहीद आफ्रिदीचा जळफळाट झाला आहे.