मुंबई : शिवसेनेचे जवळपास ३९ आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. यामधीलच सांगोल्यासारख्या ग्रामीण भागातून आमदार म्हणून निवडून आलेले शहाजीबापू पाटील यांची ओळख आज जरी झाडी, डोंगर आणि हॉटेल यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला झाली असली तरी मात्र या माणसाने आयुष्यभर अतोनात संघर्ष केला आहे. त्यातूनच त्यांना आलेले काही अनुभव त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये उपस्थित आमदाराना सांगितले आहेत.
शरद पवारांनी बंड केले आहे. ४० आमदार घेऊन काँग्रेस मधुन पळुन गेले. वसंत दादांना राजीनामा दिला असे म्हणुन शरद पवार यांना टोला लगावला आहे. माझा अनुभव खुप जोरात आहे. ज्या ज्या माणसाला शरद पवारांनी जवळ घेतले त्या त्या माणसाला दाबुन दाबुन मारुन टाकले. राज्याची प्रगती थांबता नये आणि ती प्रगती फक्त आणि फक्त तुम्हीच करु शकतात. कारण तुमच्या खात्यांचा कारभार हा आम्ही जवळुन पाहिला आहे, असं म्हणत त्यांनी शिंदेंचं कौतुक देखील केलं आहे.
दरम्यान, आता शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेलवरून रवाना झाले आहेत. सुमारे तीन तासांच्या प्रवासानंतर ते गोव्यात दाखल होणार आहेत. तसेच सर्व बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत येणार असल्याचे सांगितले जात आहे. गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी आपण उद्या मुंबईत येणार असल्याचं ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<