Shahajibapu Patil । सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आमदारांना फार कमी वेळा भेटत होते, काही ‘बडव्या’मुळे आमदार अन् ठाकरे यांच्यात दरी पडली होती, अशी टीका ठाकरेंवर शिंदे गटातील आमदार करीत असतात. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी नाराज आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यात कुणामुळे दरी पडली, याबाबत स्पष्टच सांगितलं. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी पडली, यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही राऊतांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर, या दोघांसोबतच अजूनही दोघं-तिघं यासाठी कारणीभूत आहेत अशी टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलीय. यावेळी बोलताना शहाजी बापू पाटील यांनी थेट शिवसेना खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “या दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं,” असे शहाजीबापू म्हणाले. तसेच, आणखी दोघे-तिघे यासाठी कारणीभूत आहेत,” असे ते म्हणाले.
मनसेची साथ हवी
मनसेप्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांची नुकतीच वर्षा बंगल्यावर भेट झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना शहाजीबापू म्हणाले, राज्याच्या हितासाठी शिंदे गट, भाजपसोबत मनसेची युती निश्चितपणे व्हावी. येत्या काळात 100 टक्के अशी युती होऊ शकते.
संघर्षाच दुसरी नाव म्हणजे, नारायण राणे आणि एकनाथ शिंदे
“नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्या जीवनातील संघर्ष, निलेश राणे तुमच्याही जीवनात आणि माझ्याही जीवनात आला नसल्याचं वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी केलं. संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे, नारायण राणे, एकनाथ शिंदे. एकेकाळी स. का. पाटील हे नाव राजकारणात खूप मोठं होतं. त्याच स.का. पाटलांची सभा जर कोणी उधळली असेल तर त्याचं नाव आहे नारायण राणे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ कोकणात रोवली आणि भगवा झेंडा संपूर्ण कोकणात फिरवला. नारायण राणेंना स्वतःचा जीव धोक्यात घालूनसुद्धा अनेक वेळा हे काम करावं लागलं.”, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray । मनसे अंधेरीचा गेम पालटणार का?; ठाकरे-शिंदे भेटीगाठींचा ‘राज’कीय अर्थ काय?
- Diwali 2022 | यावर्षी कधी साजरी करावी भाऊबीज, जाणून घ्या तारीख अन् मुहूर्त
- Supriya Sule | “भाजप पक्ष आता भारतीय जनता लाँड्रींग…”, सुप्रिया सुळेंचा घणाघात
- T20 World Cup। रोहित शर्माचा तो फोटो पाहून चाहते संतापले; म्हणाले विराट रोहित पेक्षा चांगला कॅप्टन
- Kisi ka Bhai kisi ki Jaan | सलमान खानच्या ‘किसी की भाई किसी की जान’ चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर