Shahajibapu Patil | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण खूप गढूळ झालं आहे. सतत सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर टीका, टिपण्णी करत असतात. यात आता बऱ्याच राजकीय नेत्यांचे दौरेही सुरू झाले आहेत. आताच उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात दौरा केला आहे. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात उद्धव ठाकरे सांगोला (Sangola) दौरा करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil)
उद्धव ठाकरेंच्या सांगोला दौऱ्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. शहाजीबापू पाटील यांनी वृत्तवाहिनीशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यापूर्वी दोनवेळा माझ्या मतदारसंघात आले आहेत. आताही ते माझ्या मतदारसंघात येत असतील तर त्याबाबत नाराज होण्याचं काहीही कारण नाही. परंतु मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दौऱ्यानिमित्त त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. त्यांचा दौरा लवकरच निश्चित होईल, असं पाटील यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे सांगोला दौरा करणार असून, त्यांच्या येण्याने तुमच्या मतदारसंघात काही फरक पडेल का?, असा सवाल शहाजीबापूंना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, माझ्या मतदारसंघात अहंकार आणि गर्व नाही. पण माझ्या मतदारसंघात कुणाच्या येण्याने काहीही फरक पडणार नाही. हा मतदारसंघ गेल्या 40 वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख आणि माझ्यात विभागला आहे. येथील घरांघरात आमची नाती, आमच्या भाव-भावना, आमची सुखं-दु:खं जनतेशी एकवटली आहेत. या मतदारसंघाची परंपरा पुन्हा एकदा देशमुख घराणं विरुद्ध शहाजीबापू पाटील अशीच कायम राहील.
महत्वाच्या बातम्या :
- Adhar Card | आधार कार्ड वरील फोटो बदलायचा असेल, तर ‘या’ स्टेप्स करा फॉलो
- T-20 World Cup । दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी द्या; कपिलदेवचा टीम इंडियाला सल्ला
- Shahajibapu Patil | बच्चू कडू अन् रवी राणा यांच्या वादावर शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Gulabrao Patil | रवी राणा यांना आवर घाला; गुलाबराव पाटलांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
- Supriya Sule | ‘सॅफ्रन कंपनी’चा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानतंर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…