मुंबई : राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच सोमवारी रात्री निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय जाहीर केला. त्यामध्ये शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’असं दिलं आहे. तर उद्धव ठाकरे गटला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं आहे. तसेच ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह दिलं असून, शिंदे गटाचे लवकरच आयोग चिन्ह जाहीर करणार आहे. अशातच शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे गटावर हल्ला केला असल्याचं समजतं आहे.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील ?
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव एकनाथ शिंदेंना गटाच्या शिवसेनेला दिलं. 40 आमदार आणि 12 खासदारांच्या भावनेची आयोगाने कदर केली असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. शहाजीबापू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध केला. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबरोबर केलेल्या युतीने शिवसेनेत दरार निर्माण केली. त्यामुळेच महाराष्ट्रातील शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. प्रामाणिक आणि नैतिकतेने काम करणाऱ्या एकनाथ शिंदेंचा हा विजय आहे, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाला मिळालेल्या चिन्हाबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणले की, त्यांना मिळालेलं चिन्ह आणि त्यांना मिळालेलं नाव याबाबत तुम्ही त्यांनाच विचारा, तेच योग्य राहील. मशाली अन्यायाविरुद्ध पेटल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील अन्यायाविरुद्ध मशाली पेटवल्या होत्या. आम्ही अन्याय दूर करणारा पक्ष आहे. हा राज्यातील जनतेचा पक्ष आहे. हे जनतेचं सरकार आहे. या सरकारमध्ये सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल घडू शकतो? हे आम्ही पाहणार आहोत. त्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मग शेतकरी कष्टकरी बळीराजा असेल, कामगार, वारकरी, समाजातील सर्व घटक महिला, विद्यार्थी, शिक्षक आदी सर्व समाजातील घटकांच्या जीवनता चांगला बदल कसा होईल, या दिशेने सरकार पावलं टाकत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, कोर्टाबाहेरुन म्हणाले…
- Shivsena । शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य एकनाथ शिंदे या गारद्याने केले; शिवसेनेचे टीकास्त्र
- Anil Parab | धगधगती मशाल सगळ्यांना जाळून टाकेल, अनिल परबांचा विरोधकांना इशारा
- Shivsena । येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे; शिवसेनेचा सामन्यातून हल्लाबोल
- Aditya Thackeray | नाव आणि चिन्ह चोरण्याचं काम करतात, पण…; आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य