Share

Shahajibapu Patil | “…तेव्हा शरद पवार कुठे होते?”, शहाजीबापू पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Shahajibapu Patil | मुंबई : सत्तांतर नंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) चांगलेच चर्चेत येत असतात. यामागील कारण म्हणजे ते वारंवार विरोधकांवर हल्लाबोल करतायेत. अशातच त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

यादरम्यान, गुवाहाटीला गेले असताना शहाजीबापू पाटलांचं एक काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल झालं होतं. मला माझ्या बायकोला साधी एक साडी घेणं देखील शक्य झालं नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर राष्ट्रवादीच्यावतीने शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीला एक साडी भेट पाठवण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देत मी ती साडी घेतली नाही असं म्हणत कारण माझी जेव्हा हलाकीची परिस्थिती होती तेव्हा शरद पवार कुठे होते?, असा सवाल शहाजीबापू यांनी केला आहे.

दरम्यान, 1999 ला झालेल्या माझ्या पराभवानंतर इथे जमलेली माझ्या मतदारसंघातील जनताच तुम्हाला सांगेल, माझ्या बायकोला साधी नवी साडी देखील मिळत नव्हती. 19 वर्ष सातत्याने घरात गरीबी होती. परंतु मी जनतेचे प्रश्न सोडवण्यात कुठेही कमी पडलो नाही. या राजकारणाच्या चढाओढीत माझी संपत्ती मला विकावी लागली त्याचही मला दु:ख वाटत नाही. कारण जनतेची सेवा हीच भगवंताची सेवा असं मी आजवर मानत आलो आहे. मात्र माझ्या गरिबीच्या काळात मी पक्षाचा कार्यकर्ता असूनही शरद पवार आणि अजित पवार हे माझ्यासोबत नव्हते याचं शल्य मला आयुष्यभर बोचत राहिलं असं पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Shahajibapu Patil | मुंबई : सत्तांतर नंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) चांगलेच चर्चेत येत असतात. यामागील कारण …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now