Share

Shahaji Patil । ‘बाळासाहेब इज बाळासाहेब!’; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शहाजी पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठवल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आयोगाच्या निर्णयानंतर दोन्ही गटांना (उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट) आयोगासमोर आपल्या पक्षाचं नाव आणि त्यासोबत तीन चिन्ह सादर करायची होती. त्यानूसार दोन्ही पक्षांनी तीन-तीन चिन्ह आणि पक्षाचं नाव सादर करण्यात आली. यानंतर काल निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केला आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय-

यानंतर आता निवडणूक आयोगाने आपला निकाल जाहीर केला आहे. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं आहे. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत.

शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया –

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शहाजीबापू पाटील म्हणाले कि, शिंदेगटाला निवडणूक आयोगाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Balasaheb Thackeray) असं नाव दिलंय. त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलंय. निवडणूक आयोगाचा निर्णय हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय झालेला आहे. तसेच यावेळी ते म्हणाले कि, बाळासाहेब या नावाची कृपा करून कुणी चेष्टा करू नये. बाळासाहेब म्हणजे ठाकरी भाषा, बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्रावर आतोनात प्रेम करणार एक नेतृत्व आणि बाळासाहेब इज बाळासाहेब!, असं शहाजीबापू म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठवल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आयोगाच्या निर्णयानंतर दोन्ही …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now